चालकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Bopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने मोटारीला धडक दिली. मोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार दरीत कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून मोटार चालक बचावला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शिवाजी विठ्ठल भोसले (वय ४५, रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरारीला बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार चालक शिवाजी भोसले हे कोंढव्यातील बोपदेव घाटातून २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने (पिकअप) मोटारीला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर मोटार चालक भोसले यांचे नियंत्रण सुटले. मोटार दरीत कोसळली. दरीतील उतारावर मोटार अडकली. सुदैवाने या घटनेत मोटार चालक भोसले यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यांच्या हाताला खरचटले. अपघातानंतर मोटार चालकाला कोणतीही मदत न करता टेम्पो चालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक खराडे तपास करत आहेत.





















