पुणे गुन्हे शाखेच्या युनिट चारची कामगिरी
marathinews24.com
पुणे – Pune Crime News ; खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. संग्रामसिंग गजलसिंग भादा (वय ३५, रा. शिवनगरी कॉलनी, डी.पी. रोड, आदर्शनगर, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध २०२२ मध्ये येरवडा पोलीस ठाण्यातंर्गत खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी पसार झाला होता.
कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्या – सविस्तर बातमी
गुन्हे शाखा युनिट चारचे पथक २० ऑक्टोबरला खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी विश्रांतवाडी चौक, पुणे-आळंदी रोड परिसरात पाच वर्षांपासून पसार झालेला आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार नितीन साबळे आणि सुभाष आव्हाड यांना मिळाली. (Pune Crime News) गुन्ह्यातील आरोपी संग्रामसिंग भादा हा दिघी परिसरातील शिवनगरी कॉलनीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संग्रामसिंग भादा हा येरवडा पोलीस ठाण्यातंर्गत दाखल खूनाच्या प्रयत्नातील आरोपी आहे. तो गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच २०२२ पासून पसार झाला होता. कारवाईसाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस अंमलदार प्रवीण राजपूत, सुभाष आव्हाड, नितीन साबळे, जहांगीर पठाण, अमजद शेख, दत्तात्रय गेंगजे, रोहिणी पांढरकर, अनिकेत भोसले आणि वैभव रणपिसे यांनी केली आहे.




















