Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुलगा ठार, आई-वडील जखमी

गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुलगा ठार, आई-वडील जखमी

खराडातील खांदेवनगरातील घटना

marathinews24.com

पुणे – नवीन गॅसची टॉकी जोडताना गळती होउन झालेल्या स्फोटात तरूणाचा मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडिल गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. ५) सकाळी सव्वा नउच्या सुमारास खराडातील खांदवेनगरात घडली आहे. दरम्यान गॅस टाकीच्या स्फोटामुळे मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खराडी पोलिसांसह अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य राबवून जखमींना रूग्णालयात दाखल केले.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८२) वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) अशी जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

अग्निशमक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, गित्ते कुटूंबिय खराडातील खांदवेनगरात राहायला असून, शुक्रवारी त्यांच्या घरातील गॅसची टाकी संपली होती. त्यामुळे नवीन टाकी जोडत असताना गॅसगळती झाली. त्यामुळे स्फोट झाल्यामुळे घरातील तिघेही गंभीररित्या जखमी झाले. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने खराडी, धानोरी, येरवडा येथून तीन वाहने रवाना करीत बचावकार्य राबवले. तिघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अग्निशमक दलाने आग पुर्णपणे विझवून कुलींग करून काम पुर्ण केले आहे.

आगीत घराचेही मोठे नुकसान

आगीमध्ये पुर्ण हॉल जळाला असून, त्यामध्ये फर्निचर, टिव्ही, वायरिंगचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच स्फोटामुळे बाथरूम, टाँयलेटचे दरवाजे, गिझर जळाले असून किचनमधील प्रिâज, फर्निचर, काही प्रमाणात झळा बसल्या आहेत. फ्लॅटमध्ये धुरामुळे सर्व भिंती काळ्या झाल्या आहेत. घरामधील एलपीजी सिलेंडर संपला असता नवीन सिलेंडर लावताना सिलेंडर लिकेज होत पसरल्यामुळे मोठा धमाका झाल्याने दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×