Breking News
Pune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूक

पुण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू; चार जण जखमी

शंकरशेठ रस्ता, कात्रजमधील आंबेगाव, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडल्या अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शंकरशेठ रस्ता, कात्रजमधील आंबेगाव, तसेच पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात अपघाताच्या घटना घडल्या. शंकरसेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात (सेव्हन लव्हज) पीमपी बसवर दुचाकी आदळून सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्राप्पा आशाप्पा गेजे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत नागप्पा बसप्पा धनगर (वय ५१, रा. स्वारगेट पाणी पुरवठा विभाग सेवक वसाहत, स्वारगेट) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मतदार नोंदणी आदेशाचे पालन न करणे महागात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आरोपी आणि अपघातात मृत्युमुखी पडलेले चंद्राप्पा हे फिर्यादी धनगर यांचे नातेवाईक आहेत. २७ मे रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास दुचाकीस्वार आणि चंद्राप्पा हे शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकी पीएमपी बसवर आदळली. अपघातात चंद्राप्पा गंभीर जखमी झाले. उपचाारदरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

कात्रजमधील आंबेगाव परिसरात अपघाताची घटना घडली. श्रीकांत वसंत भातडे (वय ४७, रा. कदम चाळ, संतोषनगर, कात्रज) असे मृत्यमुुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत भातडे यांची पत्नी श्रेया (वय ४१) यांनी आंबेगाव पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंबेगाव येथील राजमाता जिजाऊ भुयारी मार्गाजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाजवळ श्रीकांत भातडे झोपले होते. त्या वेळी मोटार मागे घेत असताना चाकाखाली सापडल्याने भातडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर डंपरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोहन शंकर माळवदकर (वय ५१, रा. गुजरवस्ती, लोणी काळभोर, पुणे-सातारा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत माळवदकर यांचा मुलगा सूरज (वय २५) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन माळवदकर २ जून रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरुन निघाले होते. कदमवाक वस्ती परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या माळवदकर यांना भरधाव डंपरने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माळवदकर यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×