Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ४० लाखाची लाच

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ४० लाखाची लाच

अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्रचार्य लाचलुचपतच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे -खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमधील वार्षिक परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि परीक्षा विना अडथळा सुरळीत पार पाडण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षांकडून ४० लाखाची लाच घेताना माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपप्रचार्य लाचलुटपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात आडकले आहेत. त्यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी निविष्ठा परवान्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी अर्ज करावेत – सविस्तर बातमी 

अवधूत भिमाजी जाधवर, (वय ५३) लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या उपप्राचार्याचे नाव आहे. जाधवर हे माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थे उपप्राचार्य आहेत त्यांच्याकडे सध्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर तक्रारदार हे एका खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत.

तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस पत्र दिले होते. जाधवर यांनी तक्रारदाराकडे परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि ती परीक्षा सुरळीत पार पाडून देण्यासाठी परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यासाठी २००० असे ४५ विद्यार्थ्यांसाठी एकूण ९० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर १० हजार रुपये घेवून पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र दिले. त्यानंतर पर्यवेक्षक येऊन परीक्षा सुरू झाली. परीक्षा सुरू असताना जाधवर यांनी उर्वरित ८० हजार रुपये देण्यासाठी तक्रारदाराच्या पाठीमागे तगादा लावला. तडजोडीअंती ४० हजार रुपये ठरले.

त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच लुचपत विभागाने मंगळवारी बारामती येथील हॉटेल सिटी इन येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून ४० हजाराची लाच घेताना लाच लुटपत विभागाने अवधूत जाधवर यांना रंगेहाथ पकडले. जाधवर यांच्यावर बारामती पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलिस अधिक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×