Breking News
डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री

खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री

शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा -कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने आवाहन 

marathinews24.com

पुणे – खरीप हंगाम २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या बियाण्याचे वितरण व विक्री व केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘साथी पोर्टल’ प्रणाली वरूनच होणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांकडून साथी पोर्टल प्रणालीवरूनच बियाणे खरेदी करण्याबाबत आग्रह धरावा, असे आवाहन पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या टोळ्या जेरबंद – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

परराज्यात उत्पादित झालेले व महाराष्ट्रात वितरण व विक्री होणाऱ्या बियाण्यांना साथी पोर्टल अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व बियाणे उत्पादक व विक्रेत्यांची नोंदणी साथी पोर्टलवर करण्यात येणार आहे. साथी प्रणालीमुळे बियाणे उद्योगात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वासार्हता निर्माण होणार आहे.

या पोर्टलमुळे बियाणे उत्पादक कंपन्या, वितरक व विक्रेते यांच्यात समन्वय वाढवून डिजिटल प्रणाली मुळे सर्व संबंधित घटक एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे व्यवस्थापन सोपे होणार आहे व बियाणे व्यवसायातील गैरप्रकाराला आळा घालण्यास मदत होणार असल्याचे कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

दत्तात्रय गवसाने, विभागीय कृषी सहरांचालक, पुणे – येत्या खरीप हंगामात सर्व बियाणे उत्पादक, वितरक व विक्रेते यांनी साथी पोर्टल प्रणालीचा वापर करूनच बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून बोगस बियाण्यांबाबचे गैरप्रकार होणार नाहीत. या प्रणालीचा वापर करणार नाहीत अशांवर कारवाई केली जाणार आहे.

कृषी निविष्ठा परवान्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी अर्ज करावेत

पुणे – शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर आवश्यक कृषी निविष्ठा चांगल्या गुणवत्तेची आणि वाजवी दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी निविष्ठा परवान्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट हे शेतकऱ्यांचे संघटित स्वरूप आहे. परवाना मिळाल्यास ते एकत्रितपणे कृषी निविष्ठा खरेदी करून शेतकरी सदस्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देऊ शकतील. तसेच कृषी निविष्ठाच्या खरेदी विक्री आणि वापराबाबत जागृती निर्माण करता येईल. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन त्यांना चांगल्या प्रतीची कृषी निविष्ठा मिळेल.

खरीप हंगामामध्ये ‘साथी पोर्टल’ वरून बियाणे वितरण व विक्री

 

परवान्यासाठी आपल्या जिल्ह्यातील परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास भेट देऊन माहिती घेऊन अर्ज करावेत, असेही पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

दत्तात्रय गावसाने, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे – शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या नामांकित कंपन्यांकडून थेट कृषी निविष्ठा खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा मिळेल. जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांनी कृषी परवान्यासाठी नोंदणी करावी.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×