Breking News
Pune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूकPune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन

सुर-संगीताने रंगली ‘बुद्ध धम्म संध्या’

‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती’तर्फे बुद्ध पौर्णिमेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरेल गीतांनी आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने रंगला. “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि”, “माझा भीमराया”, “प्रथम नमो गौतमा”, “सोनियाची उगवली सकाळ”, “भीमा तुला प्रणाम कोटी कोटी”, “जरी झाला बॅरिस्टर”, “आकाश मोजतो आम्ही” अशा गीतांद्वारे तथागत गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समानतेच्या विचारांचा सुरेल आविष्कार सादर करण्यात आला.

सुट्टीला गावी चाललाय, पण घरांच्या सुरक्षिततेचे काय ? – सविस्तर बातमी

‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे’तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार’ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायक आणि वादकांनी बुद्ध व आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारी गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी आयोजक, पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

झी युवा ‘संगीत सम्राट’ फेम तसेच ‘कलर्स मराठी सुर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील गायक संतोष मोरे, निखिल मधाळे आणि चेतन चोपडे यांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून बुद्ध आणि आंबेडकर यांच्या कार्याचा वेध घेतला. प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना भरभरून दाद दिली.

यावेळी “मेरा भीम जबरदस्त”, “त्रिसरणाची मंगलवारी”, “भिमाच्या तेजोगोल डोळ्यांची दृष्टी”, “रमाई” आदी गीतांसह बुद्ध विचार आणि धम्म आचरणावर आधारित मार्गदर्शक गीते सादर करण्यात आली. तसेच वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंह बोदडे यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांचाही जलसा रंगला.

कार्यक्रमात विजेंद्र कुंभार (पियानो), सनी कणकवार (ऑक्टोपॅड), विनोद थोरात, निखिल लांडगे आणि कृष्णा सहवासी (तबला) या वादकांनी गायकांना उत्कृष्ट साथसंगत देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×