Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

मोटारीची पाठीमागून टेम्पोला धडक; दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

दोघे जखमी; देहूरोड येथील घटना

marathinews24.com

पिंपरी – लोणावळ्यात वर्षाविहार करुन येताना समोरून जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात मोटारीतील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरु महामार्गावर देहूरोड येथे झाला.

रामटेकडीतील पोलीस वसाहतीत घरफोडी – सविस्तर बातमी 

सिद्धांत आनंद (वय २३ रा. झारखंड) आणि दिव्यराज राठोड (वय २२, रा. राजस्थान) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मोटारचालक निहाल तांबोळी, हर्ष मिश्रा दोघे जखमी झाले आहेत. टेम्पोचालक मनिषकुमार सूरज मनीपाल (वय ३९, रा.मुंबई) याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबतची माहिती दिली. सिद्धांत, दिव्यराज हे किवळेतील एका महाविद्यालयात व्यवस्थापनशास्त्राचा (बीबीए) अभ्यासक्रम शिकत होते. त्यांच्यासह चार मित्र बुधवारी रात्री लोणावळ्याला वर्षाविहारासाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे ते लोणावळ्याकडून मोटारीतून किवळेला जात होते. निहाल मोटार चालवत होता. देहूरोड येथील सेंट्रल चौकाच्या पुढे समोरून एक टेम्पो जात होता. निहाल याला समोरील टेम्पो दिसला नाही. मोटार पाठीमागून जोरात टेम्पोला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात सिद्धांत, दिव्यराज या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. निहाल, हर्ष हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाकड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×