चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर-रामटेकडी भागातील वृंदावन पोलीस वसाहतीत असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरणकुमार सावंत (वय २८, रा. वृंदावान पोलीस वसाहत, रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
थेऊरमधील पूरस्थितीस जबाबदार, ६ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत रामटेकडी भागात आहेत. सावंत यांचे घर बंद होते, चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ऐवज लांबविल्यचाी घटना नुकतीच उघडकीस आली. धनकवडी भागात घराचे कुलूप तोडून ७५ हजारांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी स्वप्नील काशीनाथ पवार (वय ३०, रा. पारमाचीवाडी, ता. महाड, जि. रायगड) याला अटक करण्यात आली. याबाबत प्रियांका भरत आखाडे (वय ३०, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.



















