Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कोथरूडमधील डहाणूकर काॅलनीत असलेल्या एका ओैषध विक्री करणाऱ्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २२ हजारांची रोकड, कॅडबरी, तसेच अन्य वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओैषध विक्री दुकानातील कर्मचारी तरुणाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात ड्रग्ज तस्करांविरूद्ध आता नगरसेवकही लढणार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण डहाणूकर काॅलनीतील एका ओैषध विक्री दुकानात कामाला आहे. २१ मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास दुकान बंद करण्यात आले. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड, कॅडबरी, तसेच हँडवाॅश असे २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. २२ मार्च रोजी सकाळी दुकानाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

कोथरुडमध्ये घरफोडी

पुणे-कोथरूड गावातील म्हातोबा मंदिराजवळ असलेल्या सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय हे कोथरूड गावठाणातील म्हातोबा मंदिराजवळ असलेल्या पृथ्वीराज अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. सदनिका बंद करुन तरुण आणि त्याचे कुटुंबीय हे २१ मार्च रोजी बाहेरगावी गेले होते. २३ मार्च रोजी ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार दगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×