Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात ड्रग्ज तस्करांविरूद्ध आता नगरसेवकही लढणार

ड्रग्ज फोटो घ्या

ड्रग्ज मुक्त प्रभागासाठी नगरसेवक पोलिसांच्या मदतीला – प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात उपक्रम

marathinews24.com

पुणे – अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, आता नगरसेवकांनाही उपक्रमात जोडण्यात आले आहे. ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ उपक्रमाद्वारे ड्रग्ज विक्रीला लगाम घातला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा चार प्रभागात उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. संबंधित भागात ड्रग्ज विक्री, तस्करांविरूद्ध पोलिसांसह नगरसेवक जबाबदारीने काम करणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा – सविस्तर बातमी  

शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थ तस्करी वाढल्याचे दिसून आले आहे. विशेषतः देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटही उघडकीस आली आहेत. त्यापार्श्वभूमीवर अमली तस्करांची पुरवठा साखळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार आता नगरसेवकही ड्रग्ज मुक्त प्रभाग करण्यासाठी सहभागी होणार आहेत. प्रभाग मुक्त ड्रग्ज असा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रायोगित तत्त्वावर पहिल्या टप्यात चार प्रभागात हा उपक्रम राबवून येथे ड्रग्जची विक्री, बाळगणे किंवा तो कोण-कोण पितो, यासंदंर्भात माहिती ठेवून पोलिसांसोबत ते उघड करणार आहेत.

पीटीपी अ‍ॅपप्रमाणेच ड्रग्जचेही अ‍ॅप

वाहतूक नियम भंगाचे फोटो पाठविण्यासाठी पुणे पोलिसांनी विकसित केलेल्या पीटीपी अ‍ॅपच्या धर्तीवर आता ड्रग्ज विरोधीही अ‍ॅप तयार केले जाणार आहे. ज्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक थेट फोटो, व्हिडीओ व लोकेशन पोलिसांना पाठवू शकणार आहेत. विशेष म्हणजे, माहिती पाठविणार्‍याची माहिती अत्यंत गुप्तता पाळली जाणार आहे. जेणेकरून ड्रग्जला ब्रेक लागणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज पाहिले जाणार आहे.

अँटी ड्रग्जविरोधी पथक ड्रग्ज मुक्तीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात अँटी ड्रग्जविरोधी पथक स्थापन केले जाणार आहे. ते फक्त ड्रग्ज विरोधात कारवाई करणार आहे. पहिल्या टप्यात शहरातील ठरावीक १० पोलिस ठाण्यात स्कॉडची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील ४४ पोलिस ठाण्यात हे पथक स्थापन केले जाणार आहे. त्यामुळे ड्रग्ज तस्करांविरूद्धची मोहिम फत्ते करण्यासाठी नगरसेवकांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे बोलले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×