Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा

पुण्यात बेकायदा होर्डिंगवर पोलिसांच्या‘पीटीपी’ अ‍ॅपचा उतारा

थेट गुन्हे दाखल करणार- पोलिस आयुक्त अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून, त्याद्वरे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित बेकायदा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ अ‍ॅपवर कळवावी. त्यानुसार आम्ही थेट गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. प्रामुख्याने नियमांना हरताळ फासत होर्डिंग उभारणार्‍यांना टागरेट केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी नुकतेच ‘होर्डिंगमुक्त पुणे’ मोहिमेची संयुक्त घोषणा केली आहे. त्याअंतर्गत शहरभर बेकायदा होर्डिंग्जबाबत धडक कारवाईला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या मोहिमेत नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे आता ‘पीटीपी’ अ‍ॅपद्वारे बेकायदा होर्डिंगवर उतारा शोधण्यात आला आहे. रस्त्यावरील बेवारस वाहने आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या वाहनांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘पीटीपी’ अ‍ॅपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदविणार्‍या नागरिकांचा वाहतूक शाखेने सोमवारी (दि. २३ ) गौरव केला. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिला आहे.

पुण्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी अ‍ॅपचा वापर केला आहे. त्याद्वारे २ लाख ४९ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पडताळणीनंतर १ लाख ७६ हजारांहून अधिक बेशिस्तांविरूद्ध चलन पाठवून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाला ५० हजार, तर इतरांना ५ ते २५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘पीटीपी’ अ‍ॅपवरील तक्रारींवर प्रभावी कारवाई करणार्‍या तीन पोलिस अंमलदारांचाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सन्मान केला. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव उपस्थित होते.

‘पीटीपी’ अ‍ॅप डाउनलोड करून त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा. विशेषतः वाहतूक नियमभंग करणारे, बेकायदा होर्डिंग लावणारे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्‍यांविरोधात आम्ही कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनो तुम्ही पीटीपी अ‍ॅपवर माहिती द्या, संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×