Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर वाहतूक वळविण्याचे आदेश जारी

 Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागातील मुख्य रस्ते सायंकाळी ५ नंतर बंद

२६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश

marathinews24.com

पुणे – पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे.

चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – सविस्तर बातमी 

कार्ला फाटाकडून एकवीरा पायथा मंदीराकडे जाणारी वाहतूकीस मनाई करण्यात येत असून कार्ला फाटा ते एकवीरा पायथा मंदिर येथे जाणारी वाहने अग्रसेन हॉटेल वाहनतळ, लाजवंती महाविद्यालय वाहनतळ, दुर्गा परमेश्वरी वाहनतळ येथे लावण्यात यावी.

दिनांक २५ मार्चच्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जुना पुणे मुंबई महामार्गावरील वडगाव फाटा ते कुसगाव बु, टोलनाका दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून वडगाव फाटा ते मुंबई-पुणे महामार्गाने कुसगाव बु. टोलनाका, मुंबई अशी वळविण्यात येत आहे.

जुना पुणे मुंबई महामार्गावरील कुसगाव बु, टोलनाका ते वडगाव फाटा दरम्यान जड वाहतूक बंद करण्यात येत असून कुसगाव बु. टोलनाका ते वडगाव फाटा मुंबई-पुणे महामार्गाने वडगाव फाटा, पुणे अशी वळविण्यात येत आहे. जड व अवजड वाहने (भाविकांची हलकी वाहने वगळून) सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×