Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

अतिक्रमण विभाग अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल

मोबाइल विक्री दुकानात चोरी; २० मोबाईल चोरीला

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ, तसेच खंडणी मागितल्याच्या आरोपावरुन नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ जणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ, तसेच खंडणीची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

विवाह समारंभात दागिने चोरीला; वाघोलीतील घटना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा स्टाॅलविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईस आरोपींनी विरोध केला होता. अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी तक्रार अर्ज दिला होता. खोटे तक्रार अर्ज दाखल करुन दबाब टाकण्याचा प्रयत्न केला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अतिक्रमण विभागातील एका निरीक्षकाविरुद्ध दाखल केलेला तक्रार अर्ज मागे घेतो, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडे खंडणी मागितली. गुन्हा दाखल केलेल्या एका महिलेने अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन महापालिकेसमोर आंदोलन केले. समाज माध्यमात चुकीचे वृत्त प्रसारित करून बदनामी केली, तसेच जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात

पुणे- देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीनाला भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले.

भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रजमधील वंडरसिटी परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी वंडरसिटी सोसायटीजवळ एक अल्पवयीन थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. अल्पवयीनाने पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, सचिन सरपाले, महेश बारावकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×