Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

विवाह समारंभात दागिने चोरीला; वाघोलीतील घटना

विवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपास

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभात वधू पक्षाच्या खोलीतून १ लाख २५ हजार रुपयांचे सो्न्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. वाघोलीतील मंगल कार्यालयात ही घटना घडली. याबाबत एकााने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी लोणी काळभोर, तसेच क्वीन्स गार्डन परिसरातील मंगल कार्यालयातून दागिने चोरून नेण्याच्या घटना घडल्या आहेत.

जादा परताव्याचे आमिष पडले ७१ लाखांना, सायबर चोरट्याने घातला गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील श्रेयस बँक्वेट हाॅलमध्ये १४ मे रोजी विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. विवाह समारंभातील गर्दीत तीन महिला वधू पक्षाच्या खोलीत शिरल्या. चोरट्या महिलांनी वधूच्या पिशवीत ठेवलेले १ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, दागिने चोरणाऱ्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.

तब्बल २२ लाखांचे दागिने चोरणारी महिला अटकेत

घरकाम करणाऱ्या महिलेने २२ लाख ८८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी पोलिसंनी एका महिलेला अटक केली. स्नेहल सुभाष साळुंखे (वय २८, रा. पुणे स्टेशनजवळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवड्यातील हरिगंगा सोसायटीत राहायला आहेत. आरोपी महिला साळुंखे त्यांच्या घरी कामाला होती. तक्रारदाराचे लक्ष नसल्याची संधी साधून साळुंखेने शयनगृहातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरुन नेले. दागिने चोरुन पसार झालेल्या साळुंखेला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×