Breking News
मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरणपुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्याकडून आढावाखुनासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला अटक

येरवड्यात दोन गटात राडा, तुफान हाणामारी

येरवड्यात दोन गटात राडा, तुफान हाणामारी

१२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना २३ मार्चला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास येरवड्यातील मांगीरबाबा चौकातील पोते वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी १२ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार मंगेश पठारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आता पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींची ओळख पटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अश्लील फोटो व्हायरल करुन तरूणीकडे मागितली २० लाखांची खंडणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोते वस्ती परिसरात असलेल्या दोन गटात काही दिवसांपुर्वी भांडण झाले होते. त्याच वादातून टोळक्याने पुन्हा २३ मार्चला एकमेकांना गाठले. हत्यारांसह दगड वीट, बांबूच्या मदतीने एकमेकांना मारहाण केली. तसेच शस्त्रे आणि बांबू हवेत फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत टोळके पसार झाले होते. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिथुन सावंत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×