Breking News
राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मानउधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाणमहापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरीपीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूकहिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्न

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

नगररचना विभागामार्फत परिसराच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याचे काम करणार

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी तसेच रस्त्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करणे, संबंधित कंपन्यांनी त्यांच्या आवारात पार्किंगची व्यवस्था करणे, अतिक्रमणे हटविणे आणि या क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती पूर्ण करावी. या सर्व उपाययोजना ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, असे निर्देश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले.

भोरमध्ये सर्वरोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभिजीत चौधरी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमआयडीसीच्या बांधकाम विभागातील अभियंते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेताना रस्ते दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था आणि अतिक्रमण हटविणे या तीन बाबींवर विशेष भर देण्यात आला. औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. कंपन्यांनी त्यांच्या आवारात पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून सार्वजनिक रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या.

औद्योगिक क्षेत्रातील तसेच सार्वजनिक रस्ते, नाले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने हटवावीत. तसेच चाकण आणि तळेगाव परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची कामेही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगररचना अभियंत्यांच्या माध्यमातून परिसराचा आढावा घेऊन आवश्यक त्या नियोजनात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक, रस्त्यांची स्थिती, पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या नागरिक, कामगार तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहेत. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून ३१ ऑगस्टची अंतिम मुदत लक्षात घेऊन सर्व उपाययोजना पूर्ण कराव्यात, असे निर्देश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×