Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू

निष्काळजीपणामुळे बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

marathinews24.com

पुणे – विजेच्या धक्क्याने बांधकाम मजुराचा मृत्यू – नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात उच्चक्षमतेच्या वीज वाहिनीचा धक्का लागल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात घडली. बांधकाम मजुराच्या सुरक्षेबाबात पुरेशी काळजी न घेतल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. पवन दित्या नायक (वय ३३, रा. मध्य प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रामाणिक कार्यकर्त्याची आज समाजाला गरज – दिलीप कांबळे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरातील हरपळे वस्तीत एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. या भागात महावितरणचे मनोरे आहेत. तेथे उच्चक्षमतेची वीज वाहिनी आहे. २६ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नायक तेथे काम करत होता. नायक याच्या हातातील बांबूचा स्पर्श वीज वाहिनीला झाला. विजेच्या धक्क्याने नायक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला फुरसुंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात महावितरणचा मनोरा आहे. तेथून उच्च क्षमतेची वीज वाहिनी जाते. बांधकाम व्यावसायिकाने सुरक्षेविषयी पुरेशी काळजी घेतली नाही, तसेच बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी गु्न्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंंदारे तपास करत आहेत.

कोथरूड भागात दहशत; वाहनांची तोडफोड – दोघे अटकेत

पुणे-कोथरूड भागातील सुतारदरा परिसरात दहशत माजवून टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याबरोबर अससेल्या अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साहिल धोडिंबा गोरे (वय १९ ,रा. गजराज मित्र मंडळाजवळ, सुतारदरा, कोथरूड), अनिकेत उर्फ विठ्ठल दत्तात्रय नालगुडे (वय २०, रा. भूगाव, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपींबरोबर असलेल्या अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा १ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरासमोर मित्राबरोबर बोलत थांबला होता. त्या वेळी आरोपी गोरे, नालगुडे आणि साथीदार तेथे आले. आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करुन दहशत माजविली. आरोपींनी परिसरातील नागरिकांच्या घरांवर दगडफेक केली. या भागातील वाहनांची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम तपास करत आहेत.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात धनकवडी, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, ओैंध परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत.

ससून रुग्णालयासमोर ज्येष्ठ महिलेकडील दागिने लंपास

पुणे- ससून रुग्णालयासमोर ज्येष्ठ महिलेकडे पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ महिला सोमवार पेठेत राहायला आहेत. त्या शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाारासमोरून निघाल्या होत्या.

त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्याकडे पोलीस असल्याची बतावणी केली. ‘या भागत चोऱ्या वाढल्या आहेत. तुमच्याकडील दागिने काढून पिशवीत ठेवा’, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविली. त्यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×