Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त-अतुल कानडे

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त-अतुल कानडे

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांची माहिती

marathinews24.com

पुणे – राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण’ समितीची आढावा बैठक संपन्न – सविस्तर बातमी 

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता . प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क , सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून “Royal Select Deluxe Whisky” या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले.

मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला आहे. त्यांच्याकडे कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्याविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×