Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कामावरुन काढल्याने ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण

‘पुणे लोकमान्य फेस्टिव्हल’चे दिमाखात उदघाटन

दोघे अटकेत; मुलीची सुखरुप सुटका

marathinews24.com

पुणे – कामावरुन काढल्याने झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. विमानतळ पोलिसांनी तपास करुन लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली. प्रिन्स पाल (वय २५), ओमनारायण पाल (वय २४, सध्या रा. शुभ निर्मल, सिंबायोसिस लॉ कॉलेजजवळ, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मुलीच्या आईने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड – सविस्तर बातमी 

गृहप्रकल्पांवर मजूर पुरविण्याचे काम ठेकेदार करतो. ठेकेदाराकडे प्रिन्स पाल आणि ओमनारायण पाल हे काम करत होते. दोघे जण व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरुन काढले. त्याचा राग मनात धरुन त्यांनी ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अपहरण केले. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा ठेकेदाराकडे काम करणारे चौघे जण बिहारला निघाल्याची माहिती मिळाली. तांत्रिक तपासात पाल रेल्वेने निघाल्याची माहिती मिळाली. दोघांनी मुलीचे अपहरण केल्याचा संशय मुलीच्या आईने फिर्यादीत व्यक्त केला होता. त्यानंतर दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवना झाले.

तांत्रिक तपासात दोघे जण इंद्रायणी एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात इंद्रायणी एक्सप्रेस पोहोचली. लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने पाल यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षांच्या मुलीची सुखरुप सुटका केली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक कल्याणला पोहोचले. आरोपींना अटक करण्यात आली. मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. मंगळवारी सकाळी मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×