Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात गणेश विसर्जन मिरवूणकीबाबत मंडळांसोबत समन्वय

पुण्यात गणेश विसर्जन मिरवूणकीबाबत मंडळांसोबत समन्वय

पोलीस आयुक्त अमितेश कुमार

marathinews24.com

पुणे – पुण्यात गणेश विसर्जन मिरवूणकीबाबत मंडळांसोबत समन्वय – गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरात विसर्जन मिरवणूकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी विविध मंडळांसोबत मंगळवारी (दि. ५) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी मंडळांच्या विविध पदाधिकार्‍यांसोबत चर्चात्मक पद्धतीने समन्वयातून मार्ग काढला जाणार आहे. त्यानुसार गणशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

ड्रेनेज लाईनच्या कामात तिघे कामगार खड्डयात पडले – सविस्तर बातमी 

शहरातील गणेशोत्सव मंडळांकडून उत्सवाची जोरदार तयारी सुरू असून, त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवूणकीत मानाचे गणपती रांगेत लागल्यानंतर त्यापाठोपाठ आमचाच क्रमांक अशी रस्सीखेच मंडळांमध्ये सुरू आहे. त्यामुळे काही मंडळांमध्ये नाराजीचा सुर असून, वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर मानाचे पाच गणपती आणि नावाजलेल्या गणपती मंडळांची मंगळवारी पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडणार आहे. संबंधित बैठकीदरम्यान विसर्जन मिरवणूक मार्ग, ढोल पथके, वादक संख्या, पारंपारिक, आधुनिक वाद्यांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांना संबंधित सूचना दिल्या जाणार आहेत.

गणशोत्सवादरम्यान या बाबींवर होणार चर्चा

पोलीस प्रशासनाकडून एक खिडकीद्वारे दिले जाणारे परवाने
गणेश मंडपात सीसीटीव्ही बसविणे
दर्शनासाठी येणारे भाविक, महिलांची सुरक्षितता
मंडळांकडून खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती
विसर्जन मिरवणूक मार्ग, वेळ, वादक संख्या
मानाचे गणपती, नावाजलेले मंडळांचे मार्गक्रमण
पोलीस-गणशोत्सव मंडळ पदाधिकारी समन्वय राखणे

वैभवशाली पंरपरा असलेला गणशोत्सव आनंदात आणि सुरक्षितरित्या साजरा करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले आहे. पोलीस- गणेशोत्सव मंडळ पदाधिकार्‍यांच्या बैठकीत समन्वयातून मार्ग काढून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला जाणार आहे. प्रामुख्याने बाप्पांची सेवा हाच प्रमुख हेतू असून, एकमेकांना सहकार्य आवश्यक आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×