Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

सिंहगड रस्ता परिसरात कारवाई

marathinews24.com

पुणे – सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त – बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल काडतूस जप्त करण्यात आले. सार्थक बाळासाहेब भगत (वय २२, रा. कोल्हेवाडी फाटा, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भगत याच्याविरुद्ध बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. भगत याच्याविरुद्ध यापूर्वी हवेली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते.

मोबाइल गेम खेळताना बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार; तरुण जखमी – सविस्तर बातमी 

सराईताकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. तो सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी भागात बसथांब्याजवळ थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी बंटी मोरे आणि स्वप्नील मगर यांना मिळाली. त्यानतंर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून भगतला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. भगत याने पिस्तूल कोणाकडून आणले ? तसेच पिस्तूल बाळगण्यामागचे कारण काय? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुन्हे शाखेचे निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, पोलीस कर्मचारी संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर यांनी ही कामगिरी केली.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक रात्री बंद

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील भिडे वाडा स्मारकाच्या बांधाकामासाठी हुतात्मा चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. दररोज रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक बदल २५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्त्यावर भिडे वाडा स्मारक आहे. या स्मारकाचे काम सुरू करण्यात आले आहे. बांधकाम साहित्य वाहतूक करणारी वाहने, अवजड क्रेन कामानिमित्त ये-जा करणार आहेत. हे काम दररोज रात्री दहानंतर करण्यात येणार आहे. त्यामुळे गाडगीळ पुतळामार्गे छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत रात्री दाह ते सकाळी सहापर्यंत या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक बदलाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील स. गो. बर्वे चाैकातून (माॅडर्न कॅफे) स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकमार्गे बेलबाग चौक, स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी श्रीकृष्ण चित्रपटगृह रस्त्याने लक्ष्मी रस्त्यावर यावे. बेलबाग चौकातून इच्चितस्थळी जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×