Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

मोबाइल गेम खेळताना बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार- तरुण जखमी

मोबाइल गेम खेळताना बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार- तरुण जखमी

उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दाखल केला गुन्हा 

marathinews24.com

पुणे – बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने तरुण जखमी झाल्याची घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात घडली. गोळीबार प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. संकेत संजय माेहिते (वय २०) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहिते याच्यासह सागर प्रदीप कोठारी (वय २२), पार्श्वनाथ शिरीष चकोते (वय २५), जाफर सादिक अली शेख (वय २०), वैभव लक्ष्मण धावडे (वय २२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.

भोंग्याविरोधात किरीट सोमय्या यांच्याकडून कारवाईची मागणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संकेत, त्याचे मित्र सागर, पार्श्वनाथ, जाफर, वैभव आणि एक अल्पवयीन रविवारी मध्यरात्री मोबाइलवर गेम खेळत होते. गेम खेळताना सागरने त्याच्याकडील बेकायदा बाळगलेले पिस्तूल मित्रांना दाखविले. पिस्तूल हाताळताना पार्श्वनाथकडून गोळी सुटली. गोळी संकेतच्या पायात घुसली. संकेत गंभीर जखमी झाला. त्याला मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती उत्तमनगर पोलिसांना मिळाली. रात्रपाळीत गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. सुरुवाताीला चौकशीत संकेतने अल्पवयीन मित्राकडून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा सागर याने पिस्तूल बाळगले होते. पार्श्वनाथ पिस्तूल हाताळत असताना गोळीबार झाल्याची माहिती संकेतने पोलिसांना दिली. त्यानंतर पोेलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले आहे. आरोपी सागरने पिस्तूल का बाळगले, तसेच त्याने कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×