Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई

‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाई

मटका अड्ड्यावर छापा, अमली पदार्थ विक्रेते गजाआड

marathinews24.com

पुणे – बेकायदा धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिानश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन क्रॅकडाऊन’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतंर्गत वडगाव शेरी, विमाननगर भागातील मटका अड्ड्यावर छापा टाकला, तसेच मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघांना अटक केली.

खासगी शिकवणीत गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

‘मिशन क्रॅकडाऊन’ मोहिमेअंतर्गत गुन्हेगारी टोळ्या, गावठी दारू, अमली पदार्थ विक्री, मटका अड्ड्यांवर कारवाईचे आदेश पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. वडगाव शेरीतील साईनाथनगर भागात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर विसेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन दुचाकी, सहा मोबाइल, जुगाराचे साहित्य असा दोन लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. चंदननगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहेत.

वाघोली परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी तुषारा बाबासाहेब म्हस्के (वय २६), राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २७) यांना अटक करण्याात आली. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विमाननगर भागात एका मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोकड, तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

‘गुन्हेगारी टोळ्या, गुटखा, गावठी दारू, अमली पदार्थ विक्री, जुगार अड्डे याबाबत नागरिकांना काही महिती द्यायची असल्यास त्यांनी परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार (मोबाइल क्रमांक – ८८०२००७९३८), विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खराड (मोबाइल क्रमांक- ९९२२७१७९९९), उपनिरीक्षक नितीन राठोड (मोबाइल क्रमांक – ९९२२७४४५९९) यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल’, असे आवाहन पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×