Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

वारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छाप

वाघोलीत तरूणावर खुनी हल्ला, आरोपी पसार

अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका

marathinews24.com

पुणे – शहरातील वारजे परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) धाड टाकून एका अल्पवयीन मुलीसह एका महिलेची सुटका केली. या कारवाईत वेश्याव्यवसायासाठी महिलांची व्यवस्था करणाऱ्या महिला एजंटला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्लेषा सचिन सोमणकर (वय ३४, रा. रूम नं. २, अंबिका निवास, हनुमान मंदिराजवळ, माई मंगेशकर हॉस्पिटलजवळ, वारजे, पुणे, मूळ रा. १५ बी-१५, ख्रिसमस हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई) हिच्यावर वारजे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यात, १५ सायकली जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला दि. ४ जूनला वारजेतील ‘साई एक्झिक्युटिव्ह लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केल्यानंतर लॉजवर अचानक छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान लॉजमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीसह महिलेची सुटका केली.

त्यानंतर महिला एजंट आश्लेषा सोमणकर हिला ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या पीडितांना संरक्षण व समुपदेशनासाठी संबंधित यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्यासह पोलिस अंमलदार ईश्वर आंधळे, बाबनराव केदार, दत्ताराम जाधव, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, वैशाली खेडेकर आणि वैशाली इंगळे यांनी सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×