Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Crime News Pune : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

Baner Murder Case : दोघांत मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा भोसकून खून

वाघोलीत आठ आरोपींना अटक

marathinews24.com

पुणे – नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाला मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी Crime News Pune आठ जणांना अटक केली. नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पुण्यात गाडीवर आमदाराचा लोगो; मालकावर गुन्हा – सविस्तर बातमी 

याप्रकरणी नामदेव बाळासाहेब आळनुरे (वय २९), बालाजी सोनाजी धनवटे (वय २२, दोघे रा. वाकलगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी), कैलास सुधाकर होरे (वय ३२, रा. चौधरी वस्ती, खराडी बाह्यवळण मार्ग), अनिल साेपान धनवटे (वय २९, रा. आव्हाळवाडी, वाघोली), नितीन लक्ष्मण उमाप (वय २१, रा. काळूबाईनगर, वाघोली), रोहन रामचंद्र वाघमारे (वय २२, रा. लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ, येरवडा), अजित शिवाजी राठोड (वय २३, रा. गणेशनगर, वाघोली), अर्जुन ज्ञानेश्वर शेलार (वय २०, रा. पूर्वरंगनगर, भावडी रस्ता, वाघोली) यांना अटक केली. याबाबत एकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ सोन्नर याचे आराेपींच्या नात्यातील एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. नवनाथ हा वाघोलीतील बाजारतळ परिसरातून गुरुवारी (२४ सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास निघाला होता. आरोपी मोटारीतून त्याच्या मागावर होते. बाजारतळ परिसरात आरोपींनी नवनाथला गाठले. Crime News Pune मोटारीने त्याला धडक दिली. धडक दिल्यानंतर तो रस्त्यात पडला. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात पाईप घातला. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. पसार झालेल्या आठ आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शहादेव शहाले तपास करत आहेत.

पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

Crime News Pune : पत्नीच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. या प्रकरणी पत्नीविरुद्ध लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश अशोक शेळके (वय ३५, रा. उत्तरेश्वर मंदिराजवळ, साठे वस्ती, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अविनाशची आई रेखा (वय ६३) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुबी अविनाश शेळके (वय ३४, रा. उत्तरेश्वर मंदिराजवळ, साठे वस्ती, लोहगाव) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश आणि रुबी यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर रुबीने अविनाशला त्रास देण्यास सुरुवात केली. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या त्रासामुळे मुलगा अविनाशने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली, असे अविनाशची आई रेखा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×