वारजे वाहतूक पोलिसांकडून कार मालकावर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कारवर फॅन्सी नंबरप्लेट लावून त्यावर ‘विधानसभा सदस्य, (Fake MLA Logo) आमदार’ असा लोगो लावून फिरणाऱ्या गाडी मालकाला पुणे पोलिसांनी वठणीवर आणले आहे. वारजे माळवाडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद केला आहे. दिग्वीजय दिपक मोरे (वय ३३, रा. नर्हे) असे गुन्हा नोंद झालेल्या मालकाचे नाव आहे. ही कारवाई २१ सप्टेंबरलाकरण्यात आली.
दागिने चोरणार्या दाम्पत्यासह टोळीला बेड्या – सविस्तर बातमी
Fake MLA Logo वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण जाधव आणि कर्मचारी कर्वे ब्रिज परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी शोरूमसमोर काळ्या रंगाची कार वाहतुकीला अडथळा होईल अशारितीने उभी असल्याचे आढळले. वाहनावर ‘एमएच.१२.एस.एफ.१२’ असा फॅन्सी नंबर होता. पुढील काचेच्या डाव्या बाजूला ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगोहोता. पोलिसांनी ई-चालान मशीनच्या माध्यमातून वाहन मालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला.
संबंधित व्यक्तीने वाहन आपले नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी काही वेळ प्रतीक्षा केली. नंतर वाहन क्रेनने वारजे वाहतूक विभागात आणून जमा केले. दुसऱ्या दिवशी वाहन मालकाकडे अधिक चौकशी केली असता तो स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही आमदार नसल्याचे निष्पन्न झाले. आमदार असल्याचे भासवून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने लोगो वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. Fake MLA Logo त्यानुसार सरकारतर्फे तक्रार देऊन गाडी मालकावर बीएनएस कलम २०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये कारवाई केली आहे.




















