Cyber Crime News : शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ५२ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – Cyber Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ५२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वाघोली आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात आर्थिक वादातून मुलावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

तक्रारदार तरुण समाज माध्यमातील जाहिरात पाहत होता. त्यावेळी शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक जाहीरात त्याने पाहिले. या जाहिरातीतील लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले. तरुणाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याचे चोरट्यांनी भासविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३७ लाख ८४ हजार रुपये गुंतविले. गुंतवणूक केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत.

कोंढवा भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×