दाम्पत्य गजाआड
marathinews24.com
पुणे – Crime News : आर्थिक वादातून १४ वर्षीय मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली.फरहान उमर शेख (वय १४) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख मोहम्मदीन फिरोज खान, मरियम शाहरुख खान (दोघे रा. हुमेरा मंजिल, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. याबाबत फरहानची आई मासूम उमर शेख (वय ३५, रा. विजय पार्क, शेर खान चाळीसमोर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फराहानचे वडील उमर यांचे आरोपी शाहरूख याच्याशी आर्थिक व्यवहारावरून वाद झाले होते. सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री पावणेदहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी मरियम हे उमर यांच्या घरी आले. त्यावेळी उमर घरात नव्हते. त्यांनी उमर यांना शिवीगाळ केली, तसेच मुलगा फरहान यालाही शिवीगाळ केली. त्यावेळी फराहाची आई मासूम यांनी मध्यस्थी केली. तेव्हा आरोपींनी मासूम यांना धक्काबुक्की केली. आईला मारहाण केल्यानंतर फराहान चिडला. त्याने आरोपींना शिवीगाळ केली.
आरोपींनी फरहानला शिवीगाळ करुन त्याच्या छातीवर शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी शाहरूख आणि त्याची पत्नी मरियम यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.





















