Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवट

Pune Water Scarcity Action Plan

पुणे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

marathinews24.com

पुणे – Pune Water Scarcity Action Plan : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आगामी कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई निवारणाचा त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करावा, असे निर्देश पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामतीत अटकावलेल्या बेवारस वाहनांचा होणार जाहीर लिलाव – सविस्तर बातमी 

राज्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शासनाने कायमस्वरूपी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना दरवर्षी ३० जूनपर्यंत राबविण्यात येतात. पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन वेळेत पूर्ण करणे आणि नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६, जानेवारी ते मार्च २०२७ आणि एप्रिल ते जून २०२७ या तीन त्रैमासिक कालावधींसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. (Pune Water Scarcity Action Plan) यंदा दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कृती आराखडा उशिरा सादर केल्यास निविदा प्रक्रिया आणि पुढील उपाय योजनांच्या मंजुरीस विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समित्या तसेच ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग आणि यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तातडीने सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×