मार्केटयार्ड भागात अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मार्केटयार्ड भागात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनिता गणेश दळवी (वय ३३, रा. श्रेयस सदन, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद साजिद खान (वय ५५, रा. हयात सोसायटी, न्यू एरा सोसायटी, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश नारायणराव दळवी (वय ४०) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाणअयात फिर्याद दिली आहे.
सराईताकडून पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अनिता दळवी सोमवारी (२२ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास मार्केटयार्ड भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी कांचनगंगा सोसायटीजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अनिता गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.





















