सराईताकडून पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

सराईताकडून पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

सराईत गुन्हेगाराला वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून केली अटक 

marathinews24.com

पुणे – गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला वारजे माळवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह जेरबंद केले आहे. इरफान करीम शेख (वय २१, रा. फ्लॅट नं. १०९, ई बिल्डींग, म्हाडा वसाहत, वारजे) असे जेरबंद केलेल्या सराईताचे नाव आहे. अंमलदार बालाजी काटे यांनी फिर्याद दिली आहे.

पत्रकार हल्ल्याचा निषेध – आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन उभे करू – सविस्तर बातमी 

नवरात्र काळात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नये, यासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी पोलिसांची दोन पथक तैनात करण्यात आली आहेत. या पथकांकडून दिवस-रात्र पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त व पेट्रोलिंक केले जात आहे. पोलिस कॉन्स्टेबल बालाजी काटे व निखील तांगडे यांना माहिती मिळाली की, गंभीर गुन्हे केलेला इरफान शेख हा म्हाडा वसाहत, वारजे परिसरात पिस्तूल दाखवून दहशत पसरवत आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे आणि तपास पथकाचे प्रभारी अधिकारी संजय नरळे यांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी म्हाडा वसाहत, वारजे येथील रिक्षा स्टंट परिसरात सापळा लावून इरफान शेख देशी बनावटीच्या एका पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. ही कारवाई पोलिस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलिस अंमलदार बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, गणेश शिंदे, सत्यजित लोंढे, अमित शेलार, अमोल सुतकर, अमित जाधव, महादेव शिंदे यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×