पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Pune Police :शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आंबेगाव, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ परिसरातील १० सराईतांना तडीपार करण्यात आले आहे. संबंधितांना एकाचवेळी तडीपार केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना दोन वर्षे पुणे शहर, पिंपरी-िंचचवड, पुणे जिल्ह्यात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.
पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
हद्दीतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. Pune Police त्यानुसार परिमंडळ दोन मधील आंबेगाव, बिबवेववाडी, भारती ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १० सराईत गुन्हेगारांना त्यांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ५६ अन्वये ही कारवाई केली आहे. संबंधित गुन्हेगारांवर मारहाण, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, मालमत्तेचे नुकसान करणे, धमकी देणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. कारवाईत आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश ऊर्फ बटन प्रकाश बांदिलकर (वय २० रा. कात्रज) रामेश्वर लक्ष्मण करे (वय २५ रा. अंजनीनगर, कात्रज) गणेश तमाराम जाधव (वय २३ रा. कात्रज) आदित्य ऊर्फ सोन्या खंडू कांबळे (वय २३, रा. आंबेगाव खुर्द) यांचा समावेश आहे. तर बिबवेवाडी परिसरातील अनिकेत विजय कोंढरे (वय २२ रा. बिबवेवाडी ) याच्यावरही तडीपारीची कारवाई केली आहे.
भारती विद्यापीठाच्या हद्दीतील किरण दत्तात्रय पांगारे (वय २३ रा. धनकवडी) विकास अनिल जाधव (वय २८ रा. गुजरवाडी, कात्रज) विवेक रमेश शेवाळे (वय २४ रा. कात्रज) गणेश ऊर्फ चिराग सचिन बडगुजर (वय २२, रा. भारतनगर, कात्रज) ओंकार अनंत बहिरट (वय २३ रा. गुजरवाडी रा. कात्रज) यांनाही तडीपार केले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, Pune Police अपर आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी केली. शहरातील सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.




















