Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

Cyber Fraud Pune : बालरोग तज्ज्ञांची ‘ऑनलाइन अपाॅईंटमेट’ महागात

(Pune Cyber Crime)

सायबर चोरट्यांकडून पावणेआठ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – नातू आजारी असल्याने संकेतस्थळावर बालरोग तज्ज्ञांची ऑनलाइन अपाॅईंटमेंट घेणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी पावणेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. Cyber Fraud Pune

पीएमपीएल प्रवासी महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकाचा नातू आजारी असल्याने त्यांनी संकेतस्थळावरुन बालरोगतज्ज्ञांचा मोबाइल क्रमांक मिळवला. सायबर चोरट्यांनी बालरोग तज्ज्ञांच्या मोबाइल क्रमांकाऐवजी स्वत:चा मोबाइल क्रमांक संकेतस्थळावर टाकला होता. या क्रमांकावर ज्येष्ठ नागरिकाने संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्यांनी बालरोगतज्ज्ञांची भेट ही ऑनलाइन पद्धतीने घ्यावी लागते. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावे लागते, असे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना नोंदणीसाठी ५ रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा करण्यास सांगितले. मात्र, ही रक्कम चोरट्यांच्या खात्यात पाच रुपये जमा झाले नाहीत.

त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ‘ओटीपी’ पाठविला. ज्येष्ठ नागरिकाने संबंधित ‘ओटीपी’ कुणाला दिला नाही. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून ७ लाख ७३ हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात वर्ग केले. बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने नऱ्हे भागातील एका महिलेची ८ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत. अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी Cyber Fraud Pune पाषाण भागातील एकाची २८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×