Breking News
MPSC Protest Pune : ‘पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्लाMPSC Protest: एमपीएससी आंदोलनाविरोधात जनहित याचिकाFarmers, Drought : दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूरPune Crime : पुण्याच्या ग्रामदैवताची दानपेटी फोडली, आरोपीला बेड्या630 Special Teachers Felicitation : दिव्यांग विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या विशेष शिक्षकांच्या कार्याचा गौरवVasundhara Pady Dindi : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वसुंधरा पायी दिंडी’चे प्रस्थानDr Anil Dudhabhate Medical Award : ‘दृष्टीदूत’ डॉ. अनिल दुधभाते यांना मराठवाडा युवा मंचचा वैद्यकीय पुरस्कारSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बारामतीत महिला आरोग्य, अवयवदान व रक्तदानाबाबत जनजागृतीSonali Kulkarni : चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी सम्यक प्रतल शोधणे आवश्यक-सोनाली कुलकर्णीPune Crime : भरदिवसा दुचाकीच्या डिक्कीतून दागिने चोरीला

Cyber Fraud Pune : अटकेची भीती दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक

Cyber Fraud Pune : अटकेची भीती दाखवून महिलेची १८ लाखांची फसवणूक

दागिने गहाण ठेवून १८ लाख ५२ हजार रुपये पाठविल्याचा प्रकार

marathinews24.com

पुणे – Cyber Fraud Pune : काळ्या पैसे व्यवहारात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेची १८ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अल्पवयीनाकडून झालेल्या गोळीबारात तरुण जखमी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरात राहायला आहे. २३ सप्टेंबर रोजी महिलेने समाज माध्यमातील खाते पाहिले. तेव्हा अशोक पटेल नावाच्या सायबर चोरट्याने महिलेला संदेश पाठविला होता. लंडनहून तुम्हाला महागड्या भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत ,अशी बतावणी अशोक पटेल असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने केली. महिलेने ऑनलाइन पद्धतीने सौंदर्यप्रसाधने केली होती. त्यामुळे संबंधित कंपनीकडून भेटवस्तू पाठविण्यात आली, असा समज महिलेचा झाला. शहानिशा न करता महिलेने स्वत:ची माहिती सायबर चोरट्यांना पाठविली. त्यानंतर कविता शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. लंडनहून पाठविण्यात आलेल्या भेटवस्तू विमानतळावर जप्त करण्यात आल्या आहेत, अशी बतावणी करण्यात आली.

Cyber Fraud Pune बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात करण्यात आला असून, प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात येणार आहे, अशी भीती दाखविण्यात आली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे बँक खात्यात जमा करावे लागतील, असे सांगण्यात आले. धमकीमुळे महिला घाबरली. तिने परिचितांकडून हातऊसने पैसे घेतले, तसेच एका सराफी पेढीत दागिने गहाण ठेवले. कुटुंबीयांना याबाबतची माहिती न देता परस्पर सायबर चोरट्यांच्या खात्यात १८ लाख ५२ हजार रुपये पाठविले. चोरट्यांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आल्यानंतर तक्रादार महिलेकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली. संशय आल्याने महिलेने चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस निरीक्षक सागर गोडे तपास करत आहेत.

एसटी प्रवासी महिलेचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास

एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४३ वर्षीय महिला एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्या निगडीतील रुपीनगर परिसरारात राहायला आहेत. त्या २ ऑक्टोबर रोजी गावी निघाल्या होत्या. निगडी एसटी स्थानकात त्यांनी बसमध्ये प्रवेश केला. बस जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने शिवाजीनगर एसटी स्थानकात पोहोचली. एसटी प्रवासात शेजारी थांबलेल्या तीन महिलांनी पिशवीतून साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले, असा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला. पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×