Breking News
Crime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणीकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरीप्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या

सिंगापूरला निघाले ‘दगडूशेठचे गणपती बाप्पा

सिंगापूरमध्ये साजरा होणार ५ दिवसांचा गणेशोत्सव

marathinews24.com

पुणे – गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात पुण्याप्रमाणेच सातासमुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तीभावाने साजरा व्हावा, या उद्देशाने सिंगापूरला निघाले ‘दगडूशेठचे गणपती बाप्पा. दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूर मधील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आली. यामुळे सिंगापूरमधील भारतीय समाजात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे प्रस्थापित होत असून, जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पांची मूर्ती सिंगापूरला येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ – जगातील सर्वात भव्य महाकाव्याचा आरंभ – सविस्तर बातमी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ येथे पाठविण्यात येणा-या श्रींच्या मूर्तीचे विधीवत पूजन मंदिरात करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मूर्तीकार भालचंद्र उर्फ लाला देशमुख, राजाभाऊ घोडके आदी उपस्थित होते. श्रीं च्या मूर्तीची उंची सव्वा तीन फूट असून पुण्यामध्ये ही मूर्ती सुभाषनगरमधील श्री नटराज आर्टचे भालचंद्र उर्फ लाला देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी महिनाभरात साकारली आहे.

सिंगापूरला निघाले 'दगडूशेठचे गणपती बाप्पा

कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, सिंगापूरमधील मंडळासाठी तीन वर्षांपूर्वी मूर्ती दिलेली होती. मागील वर्षी मंडळाने या मूर्तीचे विसर्जन केले. त्यामुळे सर्व अलंकारांनी सजलेली बाप्पांची मूर्ती यंदा गणेशभक्तांसाठी पाठवत आहोत. महाराष्ट्र मंडळ सिंगापूर येथे गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्ताने जगभरातील हिंदू बांधव एकत्र येतो आणि त्यांना गणपती बाप्पांचा आशिर्वाद प्राप्त होतो. बाप्पाची पूजा संपूर्ण जगभरात होते, त्यामुळे ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून ही मूर्ती पाठवत आहोत. यानिमित्ताने संस्कृती व धर्माची पताका सिंगापूरसह संपूर्ण जगभरात उंचावत राहो, असेही त्यांनी सांगितले.

सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजेय कुलकर्णी म्हणाले, सिंगापूरमधील महाराष्ट्र मंडळ यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करणार आहे. सन १९९४ पासून नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था म्हणून कार्यरत असलेल्या या मंडळाचा उद्देश सिंगापूरमधील महाराष्ट्रीयन समाजात आपुलकी, सौहार्द, एकोपा आणि सांस्कृतिक जाणीवा वाढवणे हा असून, गेल्या तीन दशकांपासून मंडळ महाराष्ट्राची समृद्ध परंपरा विविध उपक्रमांद्वारे सातत्याने जपते आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खास आकर्षण ठरणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे येथून सिंगापूरमध्ये आणलेली गणेशमूर्ती.

यामुळे सिंगापूरमधील भारतीय समुदायासाठी हा सण अधिक गौरवशाली आणि संस्मरणीय ठरणार आहे. पाच दिवस चालणा-या या उत्सवात धार्मिक पूजा-अर्चा, आरत्या, पारंपरिक ढोल-ताशा आणि लेझीम सादरीकरण, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top