Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

marathinews24.com

पुणे – दैनिक प्रभातचे वरिष्ठ छायाचित्रकार संदीप अशोक घोडके (वय ४६) यांचे गुरुवारी (दि. २१) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे पत्रकारितेसह सामाजिक, राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. विश्रांतवाडीतील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यात – सविस्तर बातमी

दैनिक प्रभातमध्ये रुजू झाल्यानंतर दीड दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पुण्याच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी अचूक टिपल्या. कर्तव्यदक्ष छायाचित्रकार असण्यासह पुणे स्टेशन परिसरात त्यांची स्वतःची वृत्तपत्र एजन्सीही होती. ते पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सदस्य होते. एक मनमिळावू, कष्टाळू आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या या अकाली एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दैनिक प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, आमदार बापू पठारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी श्रद्धांजलीपर भाषणात संदीपच्या कामाचा गौरव केला. याप्रसंगी दैनिक प्रभातचे सरव्यवस्थापक रविकुमार इंडी, मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक प्रवीण पारखी, एचआर व्यवस्थापक प्रवीण थूल, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, नगरसेवक बॉबी टिंगरे, सुहास टिंगरे, सुरेंद्र पठारे यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पोलीस, पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांसह छायाचित्रकार, नातेवाईक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×