Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात ऍसिड टाकून वाहनांचे नुकसान

Pune Crime News : भरदिवसा सहकारनगरमध्ये जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

8 ते 10 वाहनांचे नुकसान

marathinews24.com

पुणे – शहरातील कर्वेनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने पार्क केलेल्या वाहनांवर ऍसिडसदृश रसायन टाकून नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत 8 ते 10 वाहनांचे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके किती वाहनांचे नुकसान झाले, तसेच हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

पुण्यात कोम्बिंग ऑपरेशनचा तडाखा, ६ बांग्लादेशी महिला ताब्यात – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, कर्वेनगरमधील निवासी भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने ऍसिड किंवा रासायनिक द्रव्य फेकल्याचा संशय आहे. सकाळी वाहनमालकांनी गाड्यांवरील रंग उडालेला व बॉडी खराब झालेली पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नुकसानग्रस्त वाहनधारकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. वाहनांना लक्ष्य करण्यामागे वैयक्तिक वैर, स्थानिक वाद, खोडसाळपणा की अन्य कोणता हेतू होता, याचा तपास केला जात आहे. प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने संबंधित वाहन धारकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कर्वेनगरमध्ये वाहनांवर ऍसिड टाकून नुकसान करणारी व्यक्ती नेमकी कोण आणि त्यामागील कारण काय, तपासातूनच समोर येईल.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×