विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – विमानतळ प्रशासनाला इ- मेल पाठवून विमानात बॉम्ब ठेवण्याची योजना बनविल्याची खोटी माहीती दिल्याप्रकरणी इमेल वापरणाऱ्याविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत कुमार योगेंद्र बहाद्दुर (वय ४७ रा. रायबरेली रोड, तोलीबाग चौकाजवळ, वृंदावन योजना लखनऊ, उत्तर प्रदेश सध्या टिंगरेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी घडला आहे.
शेअरचा जादा परतावा, टास्कच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमेल पाठविणार्या आरोपीने चेन्नई ते पुणे जात असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस लँडिंगवेळी २६६१ मध्ये आरडीएक्स, आईडी स्फोट घडवून आणणार असल्याची योजना बनविल्याचा इमेल पाठवला होता. त्यानंतर सर्व विमामनळ परिसरातील सर्व गर्दी कमी करून तपासणी केली. परिसरात नागरिक व प्रवाशांमध्ये खोटी माहिती अफवा पसरवुन भितीदायक वातावरण निर्माण करून सुरक्षीतेस धोका निर्माण केल्याने हा गुन्हा करण्यात आला. इमेनंतर परिसरात सर्वत्र तपासणी करण्यात आली.





















