Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

बिबवेवाडीत डिलेव्हरी बॉयला लुटले, दोघांना अटक

अल्पवयीनाकडून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त

बिबवेवाडीतील राजीव गांधी नगरातील घटना

marathinews24.com

पुणे – डिलेव्हरी देण्यासाठी गेलेल्या तरूणाला अडवून त्याला धमकावित चोरट्यांनी ७०० रूपयांची रोकड, मोबाइल काढून घेतला. त्यानंतर त्याला दुचाकीवर बसवून तीन गल्ल्यामध्ये फिरवून लुटमार केल्याची घटना ८ जूनला रात्री सव्वा अकराच्या सुमारास बिबवेवाडीतील राजीव गांधी नगरात घडली आहे. याप्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. केतन शाम टेमकर (वय २३ रा. अपर बिबवेवाडी ) आणि खुशाल उर्फ दादया शिंदे (वय २४, रा. बिबवेवाडी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण डिलेव्हरी बॉय असून, ८ जूनला रात्री सव्वा अकराच्या सुमारास तो बिबवेवाडीतील राजीव गांधी नगरात गेला होता. त्यावेळी दोघा चोरट्यांनी त्याला अडवून ७०० रूपयांची रोकड, ५ हजारांचा मोबाइल काढून घेतला. त्यानंतर चोरट्याने त्याला आरडाओरड करू नको, नाहीतर तुझे काम होईल अशी धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराला गाडीवरून परिसरातील दोन ते तीन गल्ल्यात प्रवास करीत फिरवले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, बिबवेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक अमोल माने तपास करीत आहेत.

सिगारेटच्या मागणीचा बहाणा, जेष्ठाची सोन्याची चैन हिसकावली

दुकानदाराला सिगारेटच्या मागणीचा बहाणा करीत दुचाकीस्वार चोरट्यांनी जेष्ठाच्या गळ्यातील ३ लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना ८ जूनला संध्याकाळी सहाच्या सुमारास हडपसरमधील ससाणेनगरातील गरूड वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय दुकानदाराने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक असून, त्यांचे गरूड वस्तीवर दुकान आहे. ८ जूनला संध्याकाळी सहाच्या सुमारास ते दुकानात असताना दोघेजण दुचाकीवर आले होते. त्यापैकी एकाने खाली उतरून तक्रारदाराला सिगारेटची मागणी केली. त्यानंतर जेष्ठ नागरिक सिगारेट बघताना खाली वाकले असता, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ३ लाखांच्या सोन्याच्या चैनला हिसका मारला. अवघ्या काही मिनीटात दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×