Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

लाल महाल ते शिवाजी रोड प्रवासादरम्यान घडली घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन दोन चोरट्या महिलांनी प्रवाशी महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र कापून नेले. ही घटना ९ जूनला सकाळी पावणेबाराच्या सुमारास लाल महाल ते शिवाजी रोड प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी हडपसरमध्ये राहणार्‍या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील नवले पूल परिसरात पुन्हा अपघात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमध्ये राहायला असून, ९ जूनला कामानिमित्त त्या मध्यवर्ती भागातील लाल महाल ते शिवाजी रोड असा पीएमपीएल बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन दोघा चोरट्या महिलांनी त्यांना लक्ष्य केले. तक्रारदार महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र कापून नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर बसमधून उतरल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मेहबूब मोकाशी तपास करीत आहेत.

पादचारी तरूणीचा ७० हजारांचा मोबाइल हिसकावला

रस्त्याने पायी चाललेल्या २५ वर्षीय तरूणीला गाठून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या हातातील ७० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला आहे. ही घटना ६ जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास जुना मुंढवा रस्त्यावरील एचडीएफसी बँकेजवळ घडली आहे. याप्रकरणी वडगाव शेरीत राहणार्‍या २५ वर्षीय तरूणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×