Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

डिलिव्हरी बाॅयच्या डोक्यात बाटली फोडून रोकड लुटली

टोळक्याची तरुणाला फायटरने मारहाण

तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरनजीक फुरसुंगीतील भाई असल्याचे सांगून डिलिव्हरी बाॅयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून २१ हजार रुपयांची रोकड लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. सचिन वसंतराव सावंत (वय ३९, रा. खंडोबा माळ, फुरसुंगी, हडपसर सासवड रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत सावंतने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात दोन बांगलादेशी तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुरुवारी (१३ ऑगस्ट) मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुचाकीस्वार सावंत हे फुरसुंगीतील पाॅवर हाऊस चौकातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी सावंत यांना अडवले. ‘मला ओळखत नाही का ? मी फुरसुंगीचा भाई आहे’, असे सांगून मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी सावंत यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. आरोपींनी सावंत यांच्या खिशातील साडेसतरा हजार रुपयांची काढून घेतली. त्यानंतर त्यांना धमकावून ऑनलाइन पद्धतीने ४२०० रुपये जमा करण्यास सांगितले. सावंत यांचा मोबाइल संच हिसकावून आरोपी पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे तपास करत आहेत.

हडपसरमध्ये पादचाऱ्याला लुटले

हडपसरमधील वैदुवाडी परिसरात पादचारी तरुणाला मारहाण करुन त्याच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेंद्रकुमार सीताराम महंतो (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलसिांनी दिलेल्या माहितीनुसार, महंतो हे १३ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास वैदुवाडी परिसरातून निघाले होते. त्या वेळी एकाने त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. महंतो यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×