खराडीत दिवसाढवळ्या ५ लाखांच्या खंडणीची मागणी

दहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बांधकाम प्रकल्पाच्या साइटवर मंगळवारी संध्याकाळी सुमारे १० जणांच्या टोळक्याने जाऊन सुरक्षा रक्षकांना धमकावले. ५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. इतकेच नाही तर, पैसे न दिल्यास साइटचा कंपाउंड तोडण्याची आणि मालकाला जिवे मारण्याची उघड धमकीही दिली. ही घटना खराडी सर्वे नंबर ४२ येथील इव्हॉन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या बांधकाम साइटवर घडली.

शौचालयात जाण्याचा केला बहाणा, पळलेल्या आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी

राजू तुकाराम अस्वले (२७), विशाल रमेश भादवे (२५), सुनील रविंद्र पाटील (२५), सनी रविंद्र सोनवणे (२२), हिमेश सुभाष मोरे (१८), आकाश संजय मोरे (२४), अकुंश अशोक अडसूळ (२८), पप्पू ऊर्फ अभिषेक मिसाळ व इतर दोन अज्ञात अशा एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा प्रमुख निवृत्त लेफ्टनंट कर्नल सारंग प्रकाश पांडे यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेपाचच्या सुमारास, सुरक्षा रक्षक गेटवर ड्युटीवर असताना पाच दुचाकींवरून आलेल्या १० जणांनी गेटसमोर गर्दी करत गोंधळ घातला. गार्डने विचारणा करताच आरोपींनी थेट ५ लाख रुपये देण्याची मागणी केली आणि काम सुरू करायचं असेल तर “हिशोब” चुकवावा लागेल असे सांगितले. गार्डने विरोध करताच आरोपीने त्याचा हात पकडून धमकी दिली.

पैसे न दिल्यास साइट फोडून टाकू आणि मालकाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सारंग पांडे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×