शौचालयात जाण्याचा केला बहाणा, पळलेल्या आरोपीला बेड्या

शौचालयात जाण्याचा केला बहाणा, पळलेल्या आरोपीला बेड्या

लोणी काळभोर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – शौचालयात जाण्याचा बहाणा करून चोरटा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची घटना ४ ऑगस्टला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्याला लागलीच लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी असलेल्या गणेश बाळु उर्फ बाळासाहेब जाधव (२०, रा. जाधववाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांतील माळशिरस पोलिस ठाण्यातील सचिन भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी, आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपी जाधवला माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस गुन्ह्याच्या कामी आळंदीत घेऊन गेले होते. तेथील तपास संपवुन परत माळशिरस येथे जात असताना आरोपीने अर्जंट शौचालयात जायचे आहे असे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिस लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शौर्यवाडा हॉटेलमधील शौचालयात घेऊन गेले. यावेळी जाधवने संधीचा फायदा घेऊन टॉयलेटच्या काचा फोडून खिडकीवाटे पळून गेला. काही वेळाने आतून दरवाजा उघडला जात नसल्याने व आतुन आवाज येत नसल्याने पाहणी केली असता आरोपी शौचालयाच्या काचा फोडून पळून गेला असल्याचे निदर्शनास आले. या सर्व प्रकारानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली आहे. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेत त्याला लोणी येथील रेल्वे रूळाजवळून अटक केली.

आरोपीवर अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने माळशिरस पोलिस तपासासाठी त्याला घेऊन पुण्यात आले होते. पोलिसांना गुंगारा देऊन तो पळून गेल्याची तक्रार आमच्या पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. लागलीच आमचे पोलिस ठाण्याचे पथक कामाला लागले. त्याला लोणी येथील रेल्वे रूळाजवळून ताब्यात घेतले. त्यानंतर माळशिरस पोलिसांच्या हवाली केले. – अंकुश बोराटे, सहायक पेालिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×