Breking News
Seva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शनPune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानRana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेतPune Drunk Driving Accident : मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूWagholi Newborn Baby Case : वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकले

Deposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

Pune Senior Citizen Pension Fraud

ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप

marathinews24.com

पुणे – ठेवींवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून छत्रपती मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट साेसायटी, गेवराईचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी यांच्यासह साथीदारांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरी – सविस्तर बातमी

ठेवींवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी छत्रपती मल्टिस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी, गेवराईचे अध्यक्ष संतोष बसवंत भंडारी (रा. मिलिनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह प्रतिनिधींविरुद्ध (एजंट) हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भंडारी यांच्यासह प्रतिनिधींविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (इओडल्ब्यू) सोपविण्यात आला आहे. ठेवीदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजर रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×