Breking News
Seva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शनPune Teacher Constituency Election : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानRana Suryawanshi Attack Case : दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेतPune Drunk Driving Accident : मद्यपी टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यूWagholi Newborn Baby Case : वाघोलीत ५ दिवसांच्या नवजात बालिकेला कचऱ्यात फेकले

Pune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरी

दिल्लीतून एक जण अटकेत – आरोपीकडून १३ किलो चांदीचे दागिने जप्त

marathinews24.com

पुणे – सराफी पेढीतील भिंतीला छिद्र पाडून सोने-चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या चाेरट्यांच्या साथीदाराला दिल्लीतून अटक करण्यात आली. आरोपीकडून ३१ लाख रुपयांची १३ किलो ७९२ ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. कासीम मोहसीन शेख (वय ४१, रा. कुंचा सेठ, दरीबा कलान, चांदणी चौक, दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दोन लाखांची सुपारी, हल्लेखोरासह दोघे अटकेत – सविस्तर बातमी

मांजरी-मुंढवा रस्त्यावरील ॲव्हेन्यू काॅम्प्लेक्स इमारतीतील तळमजल्यावरील सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविण्यात आल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. या साेसायटीतील राहणारा रखवालदार सराफी पेढीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका खोलीत राहत होता. सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून रखवालदार आणि साथीदारांनी सोने-चांदीचे दागिने लांबविले होते. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाणे, गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरट्यांना अटक केली होती. या प्रकरणात एक चोरटा पसार असून, आरोपी कासीम शेख हा त्याचा नातेवाईक आहे. कासीम हा दिल्लीतील चांदणी चौक परिसरात दागिने घडविण्याचे काम करतो. सराफी पेढीत चोरी केल्यानंतर कासीमचा नातेवाईक हा दिल्लीत आला. त्याने कासीमला १३ किलो चांदीचे दागिने ठेवण्यास दिले. कासीमने १३ किलो चांदीच्या दागिन्यांची एकाला विक्री केली.

याबाबतची माहिती मांजरी पोलिसांच्या पथकाला तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. दिल्लीतून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १३ किलो चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपीला पुण्यात आणण्यात आले. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक इरफान नदाफ, उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, प्रदीप सोनवणे, संदीप राठोड, सचिन जाधव, निखील पवार, गणेश काकडे, प्रकाश बेरड, अशोक अंधारे, रवीकांत कचरे, चंद्रकांत रेजितवाड यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×