Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

Digital Arrest Scam : पोलीस इन्स्पेक्टर बोलत असल्याची बतावणी

Digital Arrest Scam

२३ लाख ५० हजारांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – Digital Arrest Scam : टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया दिल्लीतील कार्यालयातून पोलीस इन्स्पेक्टर बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेला मनी लॉड्रींगमध्ये नाव दिसून आल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना तब्बल २३ लाख ५० हजार रूपये वर्ग करण्यास सांगून ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ४ ते १६ जुलै २०२६ कालावधीत एरंडवणेत घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कैदी बाहेर आला, गांजा घेउन आत गेला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला एरंडवण्यात राहायला असून, ४ जुलैला सायबर चोरट्याने त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. टेलीकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया दिल्लीतील कार्यालयातून पोलीस इन्स्पेक्टर बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉड्रींगच्या केसमध्ये चौकशीदरम्यान महिलेचे नाव दिसून आल्याचे सांगितले. त्यामध्ये अटक केली जाणार असल्याची धमकी देउन तडजोड करण्यास सांगितले. त्यानुसार जेष्ठ महिलेचे संंबंधिताने सांगितलेल्या बँकखात्यात २३ लाख ५० हजार रूपये वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सपना देवतळे तपास करीत आहेत.

शेअरमधील गुंतवणूक पडली साडेआठ लाखांना

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित करून तब्बल ८ लाख ४६ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ९ डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२५ कालावधीत नर्‍हे परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकधारक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×