Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

Pune Crime : कैदी बाहेर आला, गांजा घेउन आत गेला

 Pune Crime

गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहाबाहेर आलेल्या बंदीवानाने पुन्हा आतमध्ये जाताना गांजा बाळगले असल्याचे अंगझडतीत उघडकीस आले आहे. संबंधित आरोपीने काही महिन्यांपुर्वी सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले होते. दरम्यान, त्याच्याविरूद्ध एनडीपीएस कलमानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखले कला आहे. निहालसिंग मुन्नसिंग टाक (वय २१ , रा. हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime) कारागृह पोलीस शिपाई समाधान हत्तीकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

बालरोग तज्ज्ञांची ‘ऑनलाइन अपाॅईंटमेट’ महागात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निहालसिंग टाक याने वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार केला होता. दरम्यान, काही महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात बंदीवान आहे. १८ जुलैला त्याला न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. कामकाज संपल्यानंतर तो दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुन्हा येरवडा कारागृहात दाखल झाला. त्यावेळी अमली पदार्थाचा संशय आल्यामुळे कारागृह शिपायाने झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ५०० रूपयांचा १२ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक केशव दिंडे, उपनिरीक्षक किशोर बेरड, उपनिरीक्षक महेश भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×