Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

परिवहन दुरुस्तीपथक वाहनांच्या धडकेत अपंग आई आधार हरपला

बीडच्या सिरसाळ्यातील घटना; परिसरात हळहळ

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – राज्य परिवहन मंडळाची दुरुस्त पथक वाहनाने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. ६) घडली आहे. गौरव नाखाडे (रा. पाडोळी ता. परळी वै.जि.बीड) असे मयत तरुणाचे नाव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दुरुस्तीपथकाच्या वाहनाची (वाहन क्रमांक एमएच ०६ बीयु ६१३७) व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला.

अफुच्या चुऱ्याची विक्री करणारा अटकेत – सविस्तर बातमी

दुर्घटनेत दुचाकीस्वार गौरव नाखाडे (रा. पाडोली, ता. परळी, जि. बीड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अजय शिंदे (रा.वडवणी) हा गंभीर जखमी झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दुरुस्ती पथकाचे वाहन हे बीडहून परळीकडे जात असताना सिरसाळ्यातील तेलगाव रोडवर अमर बार समोर समोरुन येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक बसली. दुचाकीवरील दोन्ही युवक रस्त्याच्या कडेला उडून पडले. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना गौरव नाखाडे यांची प्राणज्योत मावळली. दुसऱ्या जखमी युवकावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलीसाकडून अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे सिरसाळा व पाडोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयत युवक पाणी जार वाटपाचे सिरसाळ्यात काम करत होता. सिरसाळा पोलीसांनी वाहन ताब्यात घेतले तर चालक, वाहक यानी अपघात होताच पोलीस स्टेशन गाठत स्वाधीन केले. दरम्यान, कुटुंबाला आर्थिक मदत देऊन आधार देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गौरवच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. केवळ २० गुंठे शेती आणि वडील गावातील वाहनावर चालक म्हणून काम करतात. आई एका पायाने अपंग आहे. बेताची असल्याने गौरवने माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतले. कुटुंबाला आधार म्हणून मिळेल ते काम केले. त्याच्या पश्चात अपंग आई,लहान भाऊ, लहान बहीण आहे तो मेहनत करुन सांभाळत होता. परिस्थितीने अगदी लहान वयात त्याच्या खांद्यावर घरची मोठी जबाबदारी टाकली होती. आपली आई अंपग आहे याची त्याला कधी लाज वाटली नाही. आईचे कपडे धुण्यापासुन ते घरातील कामात आपल्या अंपग आईला गौरव मदत करत होता सिरसाळ्यात एक पाणी प्लॅन्ट वर तो काम करुन आपल्या कुटुंबांची उपजीवीका भागवत होता मात्र काल नियतीने घात केला. अंपग आईचा आधार हिरावून नेला. गौरवच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अर्थिक मदत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×