Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड

महिला सुरक्षा, पीडितांना संरक्षण, विकासकामांना गतीचा निर्धार

marathinews24.com

मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, सोमवारी ०४ मे रोजी महाराष्ट्र विधिमंडळ, विधानभवन येथे त्यांना निवडून आल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिलला डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय – सविस्तर बातमी

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी २३ एप्रिल ते १३ मे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. त्यानंतर छाननी झाली आणि उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी व कमतरता आढळल्याने ते बाद झाले. परिणामी नऊ उमेदवार आणि नऊ जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध झाली. आनंदमय क्षणी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “विधान परिषदेच्या या निवडणुकीत आम्हा नऊ उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत आधीच मिळाले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली. अर्जांमधील तांत्रिक त्रुटींमुळे इतर अर्ज बाद झाल्याने आम्ही सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलो. आज आम्हाला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र विधानमंडळाच्या निर्वाचन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले.

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत असलेले आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली. त्यांच्या या विश्वासाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी कार्यरत राहीन. महायुतीतील घटक पक्षांचे सहकार्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात अनेकांना मदत करता आली आणि पुढील काळातही महिला विकास, तीर्थक्षेत्र विकास, महिलांची सुरक्षा, पीडित महिलांचे संरक्षण, शिवसैनिकांच्या माध्यमातून विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विधिमंडळातील कामकाज प्रभावीपणे पार पाडणे यासाठी मी सक्रिय राहणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे, महाराष्ट्र शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय माशेलकर, उपनेते कला शिंदे, शिल्पा देशमुख, संजना घाडी, आशा मामिडी, सुवर्णा करंजे, ज्योती मेहेर, युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव किरण साळी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, पुणे जिल्हाप्रमुख देविदास दरेकर, पुणे महानगर प्रमुख आनंद गोयल, बीड धाराशिव संपर्कप्रमुख संगीता चव्हाण, सांगली संपर्कप्रमुख सुनिता मोरे, नांदेड संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, छत्रपती संभाजी नगर संपर्कप्रमुख प्रतिभा जगताप, अहिल्यानगर जिल्हा प्रमुख उज्वला भोपळे, संपर्कप्रमुख डॉ. शबनम इनामदार, मंचर नगराध्यक्ष राजश्री गांजाळे, मुळशी विधानसभा प्रमुख कांता पांढरे, मुंबईतील विभाग प्रमुख शालिनी सुर्वे, नीलम पवार, सुनिता वैती, शितल बीट्रा, मालती हवालदार तसेच महिला-पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×